“बेटी बचाव, बेटी पढाव” प्रतिज्ञापत्रावर मान्यवरांची सही
जालना – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने शासनाच्या विविध कार्यालयातील योजनांची माहिती देणारे प्रदर्शन भरविण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा केवले यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
या प्रदर्शनामध्ये पोस्ट, जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायिक विभाग, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासनाचा डायल वन वन टू विभाग, इनरव्हील क्लब चा महिलांच्या आरोग्यविषयक असलेला विभाग. अशा विविध प्रकारच्या स्टॉलची पाहणी मान्यवरांनी केली. विशेष करून महिलांच्या समस्या आणि आरोग्य विषयी च्या स्टॉलला न्यायमूर्तींनी आवर्जून भेट दिली आणि माहितीही घेतली. त्यासोबत” बेटी बचाव, बेटी पढाव” या स्टॉलवर भ्रूणहत्या विषयी असलेल्या प्रतिज्ञापत्रावर मान्यवरांनी स्वाक्षरी केली.
सविस्तर बातमी पहा
www.edtvjalna.com, edtv jalna app. https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk
या लिंकला क्लिक करून एप मिळवा.
-दिलीप पोहनेरकर 9422219172