जालना जिल्हा

पगार घेण्यासाठी सादर करावे लागेल लस घेतल्याचं प्रमाणपत्र

जालना- सर्वच शासकीय यंत्रणा नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे म्हणून राबत आहे. त्यामध्ये शिपायापासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत सर्वच सरकारी कर्मचारी आले. ज्यांना फ्रन्टलाइन वर्कर असेही म्हटले जाते. परंतु या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी अद्याप पर्यंत लसीकरण केले नाही. त्यामुळे आधी स्वतः करून दुसऱ्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पगार घेण्यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश सर्वच विभागांना दिले आहेत.

यासंदर्भात जिल्हा कोषागार कार्यालयालाही पत्र दिले आहे .जालना जिल्ह्यामध्ये 16 लाख 50 हजार नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. सद्य परिस्थितीत पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची टक्केवारी 68 पर्यंत पोहोचली असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची केवळ 27% संख्या आहे. ही संख्या वाढविण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग ग्रामीण भागात राबत आहे. त्यांच्या जोडीलाच आता जिल्हाधिकाऱ्यांनी अशासकीय संस्थांना देखील आवाहन केले आहे. जी संस्था अशा प्रकारचे लसीकरण केंद्र मागेल त्यांना ते उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून लसीकरणाला गती मिळेल असेही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले.

दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःहून या मोहिमेमध्ये पुढाकार घ्यावा, त्यासाठी पुढील महिन्याचा पगार घेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र विभाग प्रमुखांना सादर करावे लागणार आहे, आणि त्यानंतरच या कर्मचाऱ्यांचा पगार निघणार आहे.जालना जिल्ह्यातील एकूण लग्न 16 लाख 50 हजार आन पैकी सुमारे सात दहा टक्के लोक स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे अशा नागरिकांच्या लसीकरणासाठी देखील प्रशासन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे ,आणि त्याचाच एक भाग म्हणून हर घर दस्तक हा उपक्रम राबविला जात आहे.

*यंत्रणेवर पडणारा ताण* अनेक कर्मचाऱ्यांनी अद्याप पर्यंत लसीकरणात केलेले नाही त्यामुळे या महिन्यात त्यांचा पगार थांबविला जाईल, परंतु पुढच्या महिन्यात लसीकरणाचे प्रमाणपत्र दिल्यानंतर तो पगार दिला जाईल .त्यासाठी या महिन्यात संबंधित कर्मचाऱ्यांचा पगार थांबवणे आणि हा पगार पुढील महिन्यात पुन्हा त्याला देणे यासाठी कागदोपत्री मात्र घोडे नाचवावे लागणार आहेत. हा ताण त्या कर्मचाऱ्याच्या विभाग प्रमुखा पासून ते कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच यंत्रणेला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सर्वात उत्तम उपाय म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांनी लसचे दोन्ही डोस घेणे.

-दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button