सामान्य रुग्णालयाच्या कोविड विभागातून दोन रेमडेसिविर इंजेक्शन ची चोरी
जालना येथील सामान्य रुग्णालयाच्या कोविड सेंटर मधून रुग्णांसाठी दिलेल्या 2 रेमेडीसिविर इंजेक्शनची चोरी झाल्याची घटना दुपारी एक वाजता उघडकीस आली. याप्रकरणी परिचारिकेने दिलेल्या तक्रारीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान एकीकडे हा गुन्हा दाखल होत असतानाच रात्री साडेदहा वाजता हे दोन्ही इंजेक्शन इमारतीच्या मागच्या बाजूला पडलेले आढळून आले. यापैकी एक इंजेक्शन खाली जमिनीवर पडले होते तर दुसरे इंजेक्शन पायऱ्या वर असलेल्या जाळीत अडकून बसले आहे .
पोलीस ठाण्यात रीमा देविदास निर्मळ या परिचारिकेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दुपारी एक वाजता नेहमीप्रमाणे त्या ड्युटी साठी हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. त्यावेळेस ड्युटी बदलत असताना पहिला परिचारिका कडून सर्व माहिती घेतली आणि ,त्यानंतर टेबल वर 11 इंजेक्शन असायला हवे होते .मात्र तेथे दोन इंजेक्शन कमी निघाले ज्यामध्ये.ज्यावर जगदेव अवसारे आणि द्वारकाबाई मुळे यांची नावे होती. आजूबाजुला शोध घेतल्यानंतर देखील हे इंजेक्शन मिळाले नाही. त्यामुळे पपरिसेविका अनिता जॉन चव्हाण यांना ही माहिती दिली, आणि त्यांनी देखील आजूबाजूच्या रुग्णांना याविषयी माहिती विचारली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही .
दरम्यान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी मध्ये एक इंजेक्शन 665 रुपये किमतीचे असून अशी दोन इंजेक्शने म्हणजेच तेराशे 30 रुपयांच्या इंजेक्शनची चोरी असल्याचे म्हटले आहे.