जालना जिल्हा

लक्ष्मी स्टील मध्ये पहाटे साडेचार वाजता चोरी; पळविले 1 लाख 60 हजार

जालना- दोन दिवसांपूर्वी शहरात रात्री साडेदहा वाजता एका व्यापाऱ्याला लुटलेली घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास जुन्या  मोंढ्यातील लक्ष्मी स्टील सेंटर मध्ये चोरी झाली, आणि चोरट्यांनी 1लाख 60 हजार रुपये पळून नेले. या दोन्ही घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आणि गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अश्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी अशा घटनांचा तपास त्वरित लावा आणि जालना बंद करण्याची वेळ येऊ देऊ नये असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे.

 

जुन्या मोंढ्यामध्ये  लक्ष्मी स्टील सेंटर या नावाने पंकज अग्रवाल यांचे स्टील भांड्याचे ठोक विक्रीचे  दुकान आहे .त्यामुळे येथे नेहमीच लाखो रुपयांची उलाढाल होते . मंगळवार दिनांक 16 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पंकज अग्रवाल हे दुकान बंद करून गेले घरी.त्या नंतर  त्यांना सकाळी शटर उघडे असल्याची माहिती मिळाली आणित्यांनी दुकानात धाव घेतली. त्यावेळी दुकानाचे शटर उघडे आणि काच फुटलेला निदर्शनास आला. दुकानात पाहिले असता गल्यातील एक लाख साठ हजार रुपये चोरीला गेल्याचे कळाले. याप्रकरणी दुपारी दोन वाजेपर्यंत पोलिसांच्या तपासाचे विविध पथक येऊन गेले. त्यासोबत सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील घटना असल्यामुळे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनीदेखील व्यापार यांसोबत संवाद साधला. यामध्ये सतीश पंच, विनीत सहानी ,संजय दाड ,राजेश राऊत, आदींचा समावेश होता.

दोन दिवसांपूर्वीच व्यापारी महासंघाचे ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या मुलाला रात्री दहा वाजेच्या सुमारास शिवाजी पुतळा भागांमध्ये आडवून त्याच्याकडून अडीच लाख रुपयांची पैशाची थैली हिसकावून नेण्याचा प्रकार घडला होता.त्याचा तपास अजून बाकी आहे. तो प्रकार ताजा असतानाच आज पुन्हा पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चांगलेच भितीचे वातावरण पसरले आहे.

*लाईटवर असलेले एक शटर न उघडल्यामुळे दुसऱ्या शटर चा फोडला काच*

लक्ष्मी सेंटरच्या दुकानाचे मुख्य शटर हे विजेवर काम करणारे शटर आहे. रात्री दुकान बंद केल्यानंतर या शटर चा वीज प्रवाह देखील बंद केला होता .चोरट्यांनी पहाटे चार वाजून तीस मिनिटांनी या शटरचे कुलूप तोडले हे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. मात्र जोपर्यंत या शटरला विद्युत प्रवाह मिळत नाही तोपर्यंत हे शटर उघडत नाही, हे कदाचित चोरट्यांच्या नंतर लक्षात आले असावे, म्हणून त्यांनी बाजूच्या दुसऱ्या शटरचे  कुलूप तोडले आणि त्यानंतर देखील समोर काच आल्याचे लक्षात आले असावे आणि हा काच फोडून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केला.
दरम्यान आज घटनास्थळाला पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग ,पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेटी देऊन गुन्ह्याची पद्धत लक्षात घेतली. दुपार पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

-दिलीप पोहनेरकर,9422219172
www. edtv jalna.com
वर ,  डाउनलोड करा edtv jalna  app.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button