लक्ष्मी स्टील चोरीप्रकरणी एकाला अटक 37 हजार रुपयांसह तीन तलवारी जप्त
जालना- जुन्या मोंढ्यातील लक्ष्मी स्टील सेंटर या ठोक भांडी विक्रीच्या दुकानात काल बुधवार दिनांक 17 रोजी पहाटे साडेचार वाजता चोरी झाली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी लावला आणि एका आरोपीला अटक केली.या आरोपिकडून 37 हजार रुपये रोख आणि तीन तलवारी जप्त केल्या आहेत.
गेल्या आठवड्यातील मोठी चोरी होण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अशी जर परिस्थिती राहिली तर जालना बंद करण्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला होता. त्या अनुषंगाने पोलीस यंत्रणेने जलद पावले उचलत हा तपास पूर्ण केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तातडीने सूत्रे हलवली आणि मिळालेल्या माहितीच्या आधारावर जालना येथे गुरुगोविंदसिंग नगर मध्ये राहणाऱ्या जिनेसिंग उर्फ फार्मूला इंद्रसिंग सिंग टाक या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आणि विचारपूस केली .त्यावेळी आपल्या साथीदारांसह ही चोरी केल्याची कबुली जिनेसिंग याने दिली, आणि चोरून नेलेल्या रकमेपैकी 37 हजार रुपये पोलिसांना काढून दिले. त्यासोबत पोलिसांनी जुनेसिंग याच्या घराची झडती घेतली असता लाकडी पलंगाच्या खाली लपवून ठेवलेल्या तीन धारदार तलवारी आणि एक खंजीरही पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी गोकुळसिंग कायटे, श्यामुएल कांबळे, सचिन चौधरी, कृष्णा तनगे यांच्यासह महिला अमलदार मंदा नाटकर चंद्रकला शेडमल्लू यांनी हा तपास लावला.
-दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app