जालना जिल्हा
बिबट्यामुळे थांबवू नका कामे, याच दिवसात तो का दिसतो ?अशी घ्या खबरदारी!
जालना -बिबट्याचे नाव जरी काढले तरी सामान्य माणूस गर्भगळीत होतो. मग ज्याच्या समोर हा बिबट्या उभा असेल त्याची परिस्थिती तर विचारायलाच नको! खरेतर बिबट्या हा मुळात भित्रा निशाचर प्राणी आहे. तो दिसला तरी घाबरून न जाता काय उपाय योजना करता येतील, हा बिबट्या याच दिवसात का दिसतो? तो माणसांवर कधी हल्ला करेल? या सर्व प्रश्नांची उत्तर वन अधिकारी पुष्पा पवार यांनी दिली आहेत. सोमवारी रात्री मंठा तालुक्यात हा बिबट्या सारखा प्राणी आढळून आला होता मात्र तो बिबट्याच होता का? यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. परंतु या बिबट्याच्या अनुषंगाने जनजागृती करून शेतकऱ्यांनी खबरदारी घेऊनआपली कामे सुरू ठेवावित असे आवाहन वन अधिकारी पुष्पा पवार यांनी ई. डी. टीव्ही च्या माध्यमातून केले आहे.
-दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com