जालना जिल्हाबाल विश्व

कुपोषणावरील जनजागृती स्पर्धेत कबीर खानचे यश

जालना -सरकारी यंत्रणा वारंवार जनजागृती करूनही कुपोषणाला आळा बसत नाही. या पार्श्वभूमीवर समाजात देखील जनजागृती होणे आवश्यक आहे. या विचाराने यवतमाळ येथील, डॉ एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार पारितोषिक विजेते अनिकेत काकडे यांनी कुपोषणावर एक राज्यस्तरीय जनजागृती स्पर्धा आयोजित केली होती.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध शहरांमधून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी होती. याचे कारण म्हणजे कुपोषण हे दहा वर्षापर्यंत लक्षात येते आणि नेमकी ही जनजागृती अशा विद्यार्थ्यांमध्ये झाली पाहिजे हा त्याचा उद्देश होता. अनिकेत काकडे यांनी इन्फोसिस फाउंडेशन च्या नावाखाली 10 नोव्हेंबरला ही स्पर्धा घेतली होती, आणि त्याचा निकाल दिनांक 14 नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त घोषित करण्यात आला. या स्पर्धेमध्ये जालन्यात नववी मध्ये सेंट मेरी हायस्कूल मध्ये शिकणारा विद्यार्थी कबीर खान याने उद्योजक सुनील रायठठ्ठा यांच्या सहकार्याने या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्याने या स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविले आहे. घरातील एकुलता एक मुलगा वडिलांचे वर्कशॉप आणि आजोबा ताज अहमद खान हे सेवानिवृत्त कलाशिक्षक आहेत. अशा परिस्थितीत देखील त्याने कुपोषणावर अभ्यास करुन विशेष प्रावीण्य मिळविले आहे. या स्पर्धेसाठी त्याला पाचवीनंतर आत्तापर्यंत शिकलेला अभ्यासक्रम कामाला आल्याचे त्यांनी सांगितले.
-दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Related Articles