पाऊले चालती शंभरी ची वाट”- एक आगळा वेगळा सन्मान सोहळा
जालना- खरं तर सन्मान करण्यासाठी मुहूर्त किंवा कारण शोधायची गरज नसते, इच्छा असली तर कारण आपोआप समोर येते. आणि तसाच प्रकार जालनेकरांना अनुभवायला मिळाला, आणि सुखद धक्का देऊन गेला. पाऊले “चालती शंभरी ची वाट” या आगळ्यावेगळ्या सन्मान सोहळा चे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी आयोजन केले होते.निमित्त होते ते जागतिक वृद्ध दिन आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे.
वयाची नव्वदी पूर्ण करून शंभरीकडे वाटचाल करणाऱ्या अशा या वृद्धांचा सत्कार आज करण्यात आला .जात -पात आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं .व्यासपीठावर नाना महाराज पोखरीकर, पालकमंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या वृद्धांचा सत्कार करण्यात आल्यामुळे व्यासपीठावरील मान्यवर मंडळींनी जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांचे कौतुक तर केलेच मात्र शंभरीकडे वाटचाल करत असताना घरच्यांकडून 70 वर्षे पूर्ण केल्याबद्दल केला जाणारी शर्करा तुला असो किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर कार्यालयाच्या वतीने करण्यात येणारा सत्कार असो या दोन्ही सत्काराच्या पलीकडे जाऊन हा सत्कार करण्यात आल्यामुळे वृद्धांनी देखील या कार्यक्रमाचा भरभरुन कौतुक केलं. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या जानकीबाई शेंद्रेकर या आजींना श्री. खैरे यांनी व्यासपीठावरून उठून स्वतःहून सत्कारासाठी घेऊन गेले आणि त्यांचा सत्कार केला.
महिलांना सहावारी नऊवारी साडी आणि ब्लाउज पीस तर पुरुषांना धोतर फेटा किंवा टोपी पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र असे या सत्कार सोहळ्याचे स्वरूप होते. 131 ज्येष्ठांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगत घुगे यांनी केले.
-दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app