योग्य भाव आणि व्यापारपेठ मिळण्यासाठी मोसंबीच्या जीआयआर नोंदणीची गरज
जालना- मोसंबी पिकाला जीआय नामांकन तर मिळाले मात्र अजूनही शेतकऱ्यांमध्ये या संस्थे विषयी जनजागृती झाली नाही, त्यामुळे मोसंबीचे मोठ्याप्रमाणात उत्पादन घेऊनही शेतकऱ्यांना योग्य भाव आणि बाजारपेठ मिळत नाही. तो मिळविण्यासाठी मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी भौगोलिक संकेत नोंदणी करावी असे आवाहन जालना जिल्हा फळे व मोसंबी बागायतदार संघाचे सचिव अतुल लड्डा यांनी केले आहे.
जी आई च्या नोंदणी विषयीची सर्व प्रक्रिया जाणून घेण्यासाठी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शिरसागर, मोसंबी उत्पादक बागायतदार गणेश पडूळ यांनी या विषयी सविस्तर माहिती दिल .
*जी आय आर म्हणजे काय?* जिऑग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री, अर्थात मराठीमध्ये याला भौगोलिक संकेत नोंदणी असेही म्हणतात. भारत सरकारची ही एक संस्था आहे. जगात व्यापार पेठतयार करण्यासाठी एक मानांकन मिळते, आणि मोसंबी उत्पादन कुठे होत असेल याचा शोध घेतल्यानंतर जालना चे नाव येते? अशीही नोंदणी 31 मे 2016 मध्ये या संघाचे सचिव अतुल लड्डा यांनी केली आहे. मात्र शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत त्यांच्याकडे असलेल्या मोसंबीच्या नोंदणी जालना जिल्ह्यात या संस्थेकडे केलेली नाही. त्यामुळे आहे त्याच व्यापाऱ्यांना मोसंबी विकावी लागत आहे. आणि योग्य भावही मिळत नाही .
*जिल्ह्यात 40 हजार एकर मोसंबी* जालना जिल्ह्यामध्ये मागील पाच वर्षांपासून मोसंबीचे उत्पादन वाढले आहे. एकरी आठ ते 10 टन मोसंबी उत्पादन निघत असून पहिल्या पाच वर्षानंतर मोसंबी ला फळे येतात, आणि पुढील 25 वर्ष याचे उत्पादन घेता येते. त्यामुळे आता दिवसेंदिवस याचे क्षेत्र वाढत आहे. क्षेत्र वाढल्यामुळे उत्पादनही वाढणार आहे आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये योग्य भाव मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मोसंबी ची नोंदणी जी आयकडे करावी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देऊन योग्य भाव मिळावावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app