जालना जिल्हा

मित्रानेच केला मित्राचा खून; आरोपी अटक


जालना

किरकोळ वादातून आठ दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना गांधीनगर परिसरात रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली संतोष शिवलाल दाभाडे आणि श्याम थोरवे व 20 हे दोघे चांगले मित्र होते आठ दिवसांपूर्वी या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संतोष दाभाडे याने श्याम थोरवे याच्या पोटात चाकू खुपसला गांधीनगर भागातील ओम साईराम हॉटेल समोर ही घटना घडली दरम्यान याप्रकरणी मयत शाम थोरवे याचा मावसभाऊ
देविदास पवार वय 23 वर्ष, व्यवसाय केटरिंग काम, रा. गांधी नगर, रेणुका माता मंदिर समोर, जालना. याच्या तक्रारी वरून गुन्हा नोंदकेला आहे.
घटनास्थळी सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी ताबडतोब धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खेळकर यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.

Related Articles