Advertisment
जालना जिल्हा

समविचारी पक्षासोबत युती ची तयारी; आनंदराज आंबेडकर

जालना- समविचारी पक्षासोबत येणाऱ्या निवडणुकांमध्ये युती करण्याची तयारी असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिली. या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ते आज जालन्यात आले होते. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जालन्यातील काम समाधानकारक आहे मात्र नगरपालिकेच्या वतीने नागरिकांवर अन्याय होत आहे, आणि एवढा पाऊस पडलेला असताना देखील जालनेकरांना दहा ते पंधरा दिवसाआड पाणी मिळत आहे ही गंभीर बाब आहे. पालिकेने या प्रश्नाकडे जर लक्ष दिले नाही तर पक्षाचे कार्यकर्ते याला वाचा फोडतील अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान येणाऱ्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष आंबेडकर विचारसरणीच्या कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास तयार आहे, परंतु कोणत्या पक्षाला सोबत युती करायची ही आयत्यावेळी ठरवले जाईल असेही त्यांनी सांगितले.यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव संजीव बोधनकर ,मराठवाडा महासचिव अण्णासाहेब चित्तेकर ,लिंबाजी वाघुळकर, दिनेश आदमाने, भैय्यासाहेब भालेराव, मुजीब पठाण, मराठवाडा अध्यक्ष रविंद्र पाटोळे, भिमराज खरात, चंद्रकांत खरात ,मच्छिंद्र खरात, आदींची उपस्थिती होती.

दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button