Jalna District

वन वन टू डायल करून चुकीची माहिती देणे पडले महागात; झाला गुन्हा दाखल

जालना- गुन्हेगारीला आळा बसावा आणि आपत्कालीन वेळेस त्वरित मदत मिळावी म्हणून शासनाने डायल “वन वन टू”ही आपत्कालीन सुविधा सुरू केली आहे. हा नंबर डायल केल्यानंतर लवकरात लवकर संबंधित व्यक्तीला मदत मिळते. मात्र अनावश्यक वेळेस तो डायल केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल ठरते. आणि मग गुन्हाही दाखल होतो. असाच प्रकार आज जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवमूर्ती येथे घडला. अशोक एकनाथ मस्के आणि त्यांचे साडू दिपक वाहूळे राहणार सिरसवाडी या दोघांमध्ये आपापसात भांडणे सुरू झाली ,आणि अशोक म्हस्के यांनी, वन टू डायल करून “आम्ही चोर धरून ठेवले आहेत लवकर या” असा संदेश दिला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका जालना पोलीसांच्या दोन्ही जीप काही वेळातच घटनास्थळी पोहचल्या परंतु प्रत्यक्षात मात्र तिथे तसे काहीच नव्हते. या दोन्ही साडू चे किरकोळ भांडण झाले होते आणि अशोक मस्के यांनी पोलिसांना चुकीची माहिती दिली होती. चुकीची माहिती देऊन पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी अशोक मस्के यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 177 अन्वये तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

* काय आहे 177 कलम* शासकीय कर्मचाऱ्याला खोटी माहिती देणे हा गुन्हा आहे हे माहीत असताना देखील अशा कर्मचाऱ्याला खोटी माहिती देऊन त्याची दिशाभूल करणे,हा याचा अर्थ आहे. या कलम मध्ये खोटी माहिती देणाऱ्या अपराध्याला सहा महिन्यांपर्यंत साधा कारावास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
-दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button