पहिली ते चौथी शाळा सुरू करायला आमची परवानगी- आरोग्य मंत्री टोपे

जालना- शिक्षण मंत्र्यांनी पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाची परवानगी मागितली होती, आणि त्यानुसार आम्ही त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. मात्र शाळा कधी सुरू करायच्या हा विषय पूर्णतः हा त्यांचा आहे. खरे तर आता शाळा सुरू करायला हरकत नाही. कारण गेल्या दोन वर्षांपासून मुले घरामध्ये बंदिस्त आहेत, या वयातच मेंदूचा विकास होतो, आणि आता जास्त दिवस मुले घरात बसली तर मेंदूवर विपरीत परिणाम देखील होईल त्यामुळे शाळा सुरू व्हायला पाहिजेत असे आपले मत आहे. अशी माहिती जालन्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
दरम्यान 11 ते 20 वयोगटातील मुलांमध्ये देखील कोरोना चे प्रमाण वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. या संदर्भात बोलताना आरोग्यमंत्र्यांनी या प्रकाराला दुजोरा दिला आहे, आणि अशा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी देखील लसीकरण केले पाहिजे अशी मागणी आपण केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान शाळा सुरू करण्याबाबतचा चेंडू आता शालेय शिक्षण मंत्र्यांच्या तंबूमध्ये आहे.
-दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app