Jalna District

माइंड कंट्रोल जैन मुनींकडून शिकावे-ना.राजेश टोपे

जालना -श्री दिगंबर जैन समाजाचे धर्मगुरू महाकवी जगद्गुरू संत शिरोमणी दिगंबराचार्य विद्यासागर यांच्या” संस्कृती शासनाचार्य सुवर्ण महोत्सव” वर्षानिमित्त त्यांच्यावरील टपाल पाकिटाचे प्रकाशन आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह औरंगाबाद विभाग विभागाचे जनरल पोस्ट मास्तर व्ही. एस. जयशंकर, जालना चे अधीक्षक जी. हरि  प्रसाद, यांच्यासह अध्यक्ष पंकज पाटणी, प्रणय पांडे, महावीर लोहाडे, आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की मनाला ताब्यात कसं ठेवायचं ,अर्थात माइंड कंट्रोल कसं करायचं ते जैन मुनी कडूनच शिकलं पाहिजे. जैन मुनि सोबतच सर्वच मुनी मानवजातीसाठी आदर्श आहेत आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर समाजाने चालले तर समाजासोबतच आपलीही प्रगती होण्यासाठी वेळ लागत नाही. अन्य मान्यवरांनी देखील यावेळी समयोचित भाषणे केली. कार्यक्रमाचे स्वागत गीत सौ. रीना बडजाते,सौ, दिपाली पाटणी, समता गोधा यांनी गायले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव जैन आणि अभिजित साबळे यांनी केले.

*दिगंबराचार्य विद्यासागर यांची ओळख* दिगंबर आचार्य विद्यासागर यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 ला कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात असलेल्या सदलगा येथे झाला. 30 जून 1968 रोजी अजमेर येथे त्यांनी मुनी दिक्षा घेतली. 22 नोव्हेंबर 1972 ला त्यांना आचार्य पद मिळाले. त्यांनी आत्तापर्यंत मूकमाटी या महाकाव्य सह अन्य शंभर ग्रंथांची रचना केली आहे. हिंदी, संस्कृत, प्राकृत, अशा सात भाषांमध्ये त्यांनी साहित्य लिहिले आहे. 462 साधकांना त्यांनी दीक्षा दिली आहे तर 72 गो शाळेचे ते प्रेरणास्थान आहेत. जैन आचार्य श्री विद्यासागर महामुनीराज यांच्या 50व्या आचार्य पदाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी त्यांच्यावरील टपाल पाकिटाचे प्रकाशन करण्यात आले.
-दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button