जिल्हाधिकाऱ्यांचे दालन; दोन्ही भाजपाचा गोंधळ; राष्ट्रवादीचा संताप; आणि खोतकर यांची प्रतिक्रिया
जालना जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर येत आहेत आणि त्या पद्धतीने हळूहळू दोन्ही भाजपामधील वादही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. भाजपा देखील आता आमने-सामने यायला लागली आहे. 18 तारखेला माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले आणि विविध प्रश्नांवर जिल्हाधिकार्यांना तातडीची बैठक बोलावण्यास भाग पाडले. नेमका हाच धागा पकडून काल केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या भाजपाने देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसखोरी केली. खरेतर जिल्ह्यामध्ये सध्या जमावबंदीचा आदेश लागू आहे. त्यामुळे आंदोलने, उपोषणे, मोर्चा, या सर्व प्रकाराला बंदी आहे. असे असतानाही ज्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश लागू केले त्यांच्या दालनामध्ये असा प्रकार घडत आहे. मात्र राजकीय दबावामुळे यांच्यावर कुठलीही कार्यवाही होत नाही. दोन्ही भाजपा पदाधिकाऱ्यांनी एक दुसऱ्या बद्दल केलेले वक्तव्य, माजी मंत्री लोणीकर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या बद्दल केलेलं वक्तव्य या सर्व प्रकरणावरून जिल्ह्यातील दोन्ही भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र सैरभैर झाले आहेत. या प्रकरणावर शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिलेली ही प्रतिक्रिया.
दरम्यान बबनराव लोणीकर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस च्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एक बैठक घेऊन बबनराव लोणीकर यांचा जाहीर निषेध केला काही आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली
-दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app