Jalna Districtजालना जिल्हा

पोलिसांच्या गाडीला धडक; 24 तासात निकाल ;3200 रुपये दंड

जालना- मोटार अपघाताचे खटले वर्षानुवर्ष न्यायालयात खितपत पडतात मात्र जर पोलिसांनी मनावर घेतले तर अशा प्रकरणांमध्ये 24 तासात ही निकाल लागू शकतो मात्र त्यासाठी तत्परता हवी. त्याचे उदाहरण म्हणून मंठा पोलिसांनी अपघात झालेल्या वाहनावर गुन्हा नोंद करून 24 तासात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आणि न्यायालयाने देखील वेगवेगळ्या कलमांखाली संबंधित वाहनचालकाला तीन हजार दोनशे रुपये दंड केला आहे. ज्या वाहनाला ठोस दिली ते वाहन पोलिसांचे आहे, हे यामध्ये विशेष.

सोमवार दिनांक 22 रोजी जालना तालुक्यातील सेवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उबाळे हे रात्री मंठा पोलिस ठाण्याला भेट देऊन सेवली इकडे जात होते. दरम्यानच्या काळात बरबडा पाटीवर समोरून येणाऱ्या महिंद्रा झायलो क्रमांक एम एच 12 जी झेड 59 39 या जीपने पोलिसांच्या एम एच 21 बीक्यू 52 39 या गाडीला समोरून फौज दिली. वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांच्या वाहनाचे चालक भगवान अंकुश खरात यांनी दिनांक  23 ला मंठा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी एस. जी. चव्हाण ,आणि व्ही .एस. कातकडे यांना दोषारोप पत्र तातडीने दाखल करण्याच्या सूचना केल्या ,त्यानुसार मंठा न्यायालयात आज आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायाधीश श्री. शर्मा यांनी संबंधित वाहनचालकाला वेगवेगळ्या कलमानुसार एकूण तीन हजार दोनशे रुपये दंड ठोठावला आहे, आणि हा दंड न भरल्यास 15 दिवसाची साधी कैद सुनावली आहे.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button