निलंबित पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर अकार्यकारी पदावर हजर होणार
जालना- सहा महिन्यांपूर्वी लाचखोरीच्या प्रकरणात रंगेहाथ पकडले तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुधिर अशोक खिरडकर यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश जारी झाले आहेत. गृहविभागाच्या आज दिनांक 24 नोव्हेंबर च्या शासन निर्णयानुसार सुधीर खिरडकर यांना अकार्यकारी पदावर नियुक्त करण्यात यावे असे आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार अवर सचिव चेतन निकम यांनी जारी केले आहेत.
या शासन शासन निर्णयामध्ये म्हटले आहे की, सुधिर अशोक खिरडकर यांच्यावर लाचलुचपत कायद्यान्वये तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयातील तरतुदीनुसार अप्पर मुख्य सचिव गृह विभाग यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीची दिनांक 13 ऑक्टोबर 2021 रोजी बैठक झाली. या बैठकीतील आढाव्या अंती निलंबित पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर यांना शासन सेवेत पुन्हा स्थापित करण्याची शिफारस सक्षम प्राधिकारी यांना करण्यात आली होती, त्या शिफारशीनुसार सक्षम प्राधिकारी यांनी मान्यता दिली आहे.
त्याअर्थी मा. न्यायालयाचा अथवा सक्षम प्राधिकारी यांच्या निर्णयाच्या अधीन राहून तसेच त्यांच्याविरुद्ध प्रस्तावित विभागीय चौकशीच्या अधीन राहून या आदेशान्वये सुधीर खिरडकर यांना या आदेशाच्या दिनांकापासून शासन सेवेत पुनर्स्थापित करण्यात येत आहे
*अकार्यकारी पद* हे आदेश काढत असताना त्यामध्ये असेही सूचित करण्यात आले आहे की, सुधीर शिरडकर यांना अकार्यकारी पदावर पदस्थापना देण्यात यावी( असे पद जिथे सामान्य जनतेचा आणि त्यांचा थेट संपर्क येणार नाही)
-दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app