पोलीस देणार महिला युवतींसाठी स्वसंरक्षणाचे धडे

जालना- दिवसेंदिवस युवती आणि महिलांची होणारी छेडछाड, आणि त्यातून वाढत जाणारी गुन्हेगारी. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने आता महिला व युवतींना सक्षम करण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तीन दिवसीय महिला व युवतींसाठी स्वसंरक्षणाचे धडे देणारे प्रशिक्षण पोलीस प्रशासनाने आयोजित केले आहे.
उद्या दिनांक 25पासून ते दिनांक 27 दरम्यान पोलीस प्रशिक्षण देणार आहेत. मंगळसूत्र चोरांना कसे पकडायचे? पेनाच्या साह्याने कसे स्वसंरक्षण करायचे?पाकितमार कसे पाकीट मारतात! यासह अन्यही बरीच माहिती आणि स्वतःचे संरक्षण करण्या विषयीचे टिप्स पोलीस देणार आहे .सकाळी आठ ते दहा या वेळेत होणारे हे प्रशिक्षण सर्वांसाठी मोफत आहे. इच्छुक युवती व महिलांनी सकाळी आठ वाजता सर्वे नंबर 488 च्या पोलिस मुख्यालय मैदानावर उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
-दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app