Jalna Districtजालना जिल्हा

आयटीआयच्या 100 विद्यार्थ्यांना फियाट कंपनीत नोकरी

जालना- covid-19 चा काळ आता हळूहळू संपायला लागला आहे आणि नोकऱ्या मिळण्याचे दिवस यायला लागले आहेत. तरुणांना कामधंदे ही मिळायला सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या 100 विद्यार्थ्यांची रांजणगाव येथील फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने प्रशिक्षणार्थी म्हणून निवड केली आहे.

जालना-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआय या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना स्वबळावर उभे राहून उद्योगधंदे कसे सुरू करायचे याविषयी प्रशिक्षण दिल्या जाते. व्यावसायिक अभ्यासक्रमावर इथे जास्त भर दिला जातो. त्यानिमित्ताने नोकरी देखील उपलब्ध होते. काल दिनांक 24 रोजी रांजणगाव येथील फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे अधिकारी एन. बी. वाघमोडे यांनी या संस्थेत येऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीसाठी दोनशे विद्यार्थी आले होते. मात्र 100 विद्यार्थी कंपनीच्या निकषांतसाठी पात्र ठरले.  या शंभर विद्यार्थ्यांना कंपनीने प्रशिक्षणासाठी बोलावले आहे.

ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी सह प्रशिक्षणार्थी सल्लागार के.बी. ठाकूर, सहनिर्देशक एस.एस. कापसे, सौ. व्ही. आर. काळे, सौ. एस .एस. जोशी, आदींची उपस्थिती होती. मुलाखती पार पाडण्यासाठी एस. जी. कदम आणि एस. जी चव्हाण यांनी परिश्रम घेतले. मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, वेल्डर या आणि अन्य काही पदांसाठी या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. पात्र प्रशिक्षणार्थ्यांना  16 हजार रुपये दरमहा पगार मिळणार असून बस, कॅन्टीन, आणि गणवेशाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button