Jalna District

एकलकोंड्या मुलांवर गुन्हेगारांचे जास्त लक्ष- पोलीस उपाधीक्षक राजगुरू

जालना -एकलकोंड्या मुलांवरच गुन्हेगारांचे जास्त लक्ष आहे. असे मत जालन्याचे पोलिस उपाधीक्षक नीरज राजगुरू यांनी व्यक्त केले आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस मैदानावर असलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये महिला व तरुणींसाठी “सेल्फ डिफेन्स” अर्थात स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. आज पहिल्या दिवशी या प्रशिक्षणाचा समारोप प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस निरीक्षक श्री. नाचण यांची उपस्थिती होती. तीन दिवसांसाठी महिला व युवतींसाठी सकाळी आठ ते दहा या वेळेत हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सर्वांसाठी हे प्रशिक्षण खुले असून विनामूल्य आहे.
यावेळी बोलताना श्री. राजगुरू म्हणाले की, दिवसेंदिवस मुलांच्या हातात मोबाईल चे प्रमाण वाढले आहे. मोबाईल लॅपटॉप, आणि कम्प्युटर हे आवश्यक जरी असली तरी त्याचा अति वापर होत असल्यामुळे मुले एकलकोंडी बनत आहेत. आणि सोशल मीडियामुळे गुन्हेगार अशा एकलकोंड्या मुलांना आपले लक्ष करत आहेत. कारण ते गुन्हेगारांच्या जाळ्यामध्ये लवकर फसतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे आणि आवश्यकतेपेक्षा जास्त मोबाईलचा वापर टाळावा. एकलकोंड्या मुलांना अशा प्रकारात पासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी मुलांना इतर मित्रांसोबत बाहेर पाठवणे, गप्पागोष्टी करणे, घरातही मिळालेल्या वेळेमध्ये एकत्र बसणे, संदर्भित स्वतंत्र मोबाईल न देता एकाच मोबाईलवर सर्वांची कामे करणे, यावर भर दिला पाहिजे,  असे आवाहनही त्यांनी केले. आजच्या या प्रशिक्षणासाठी विद्यार्थिनी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सोनवणे यांनी केले.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button