देवघरात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास

जालना- चंदंनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि या ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या सुंदर नगर भागात रात्री चोरी झाली. देवघरामध्ये ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
सुंदर नगर मध्ये अलकाबाई विठ्ठल जाधव या 48 वर्षाच्या महिला एकट्याच राहतात. घर साधारणच आहे. काही कामानिमित्त त्या काल बाहेरगावी गेल्या होत्या आणि ही संधी साधून चोरट्यांनी दाराचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरामध्ये कपाटाचे कुलूप तोडून देखील सर्व साहित्य विस्कटून टाकले, मात्र कदाचित त्यांना काहीच न मिळाल्याने देवघरा कडे मोर्चा वळवला असावा. अलकाबाई जाधव यांनी देवघरामध्ये ठेवलेले 53 हजार रुपये रोख आणि सोन्याची एकदाणी, मनी, आणि सोन्याचे इतर दागिने असा सुमारे एक लाख रुपयाचा सोन्याचा मुद्देमाल आणि 53 हजार रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले आहेत. चंदंनजिरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ही घटनास्थळाला भेट दिली आहे आणि पोलिसांच्या ठसे तज्ज्ञांचे पथकही ठसे घेऊन गेलेले आहेत ,मात्र अद्याप पर्यंत चोरट्यांचा कोणताही सुगावा लागलेला नाही.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app