40 हजारांची लाच घेताना कृषी सहाय्यकासह एक जण जाळ्यात
जालना- या प्रकरणातील तक्रारदाराच्या वडिलांच्या नावाने पोखरी टाकळी शिवारात गट नंबर 163 व त्यांच्या भावाच्या नावाने गट नंबर 180 मध्ये शासनाच्या पोखरा योजना अंतर्गत रेशीम शेती करण्यासाठी तुतीच्या रोपाचे अनुदान मंजूर झाले आहे .मात्र ते अद्याप पर्यंत त्यांच्या खात्यावर जमा झाले नव्हते. हे जमा करण्यासाठी प्रत्येकी वीस हजार रुपये अशा दोन संचिकेच्या चाळीस हजार रुपयांची मागणी मंठा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक महेश दिनकर खंडागळे वय तीस राहणार मोरगाव ालुका सेलू जिल्हा परभणी यांनी केली .
परंतु लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याशी संपर्क साधला आणि या तक्रारीची शहानिशा करून या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि सापळ्या मध्ये कृषी सहाय्यक महेश दिनकर खंडागळे आणि एक खाजगी व्यक्ती सुनील अंकुश सोनटक्के वय 24, राहणार घारे कॉलनी मंठा या दोघांना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक एस. एस .शेख यांच्यासह पोलीस अधिकारी मनोहर खंडागळे, पोलीस अधिकारी गणेश चेके, जावेद शेख ,प्रवीण खंदारे ,यांनी हा सापळा रचण्यात भाग घेतला.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app