ब्राह्मण समाजाचे शनिवारी दीपावली स्नेह मिलन

जालना- ब्राह्मण समाजाच्या वतीने शनिवार दि.27रोजी संध्याकाळी 6.00 वा. पाठक मंगल कार्यालय, मुक्तेश्वर मंदिर जवळ, जुना जालना येथे दीपावली स्नेह मिलन आयोजित करण्यात आले आहे.पुणे येथील स्वरूप देशपांडे आणि मानसी कुलकर्णी देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेला “स्वरोत्सव” या संगीत मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास सर्व समाज बंधुभगिनींनी मोठ्या स्वरुपात उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन दीपावली स्नेहमिलनचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांच्या सह कार्यकारिणी पदाधिकारी, सचिन देशपांडे, विश्वंभर कुलकर्णी, विनोद कुलकर्णी, दिलीप देशपांडे, किशोर देशपांडे,गिरीश राखे, शिरिष देवळे, शिवाजी जोशी,शार्दुल भाले, अतुल हेलसकर,मधुसूदन दंडारे,डाॅ.पौर्णिमा रुईखेडकर,आनंदी अय्यर, विशाखा नाईक, अरूणा फुलमामडीकर, उमेश पंचारिया, दिपक त्रिवेदी, गणेश लोखंडे यांनी केले आहे.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app