राज्य

परीक्षेसाठी जाणाऱ्या चारचाकीला अपघात; तीन ठार एक गंभीर

जालना- परीक्षेसाठी जाणाऱ्या वाहनाला अपघात होऊन तीन जण ठार आणि एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली.

अंबड कडून  घनसांवगी ला टायपिंगच्या परीक्षेसाठी अंबड तालुक्यातील लालवाडी येथील सुनील मदन, घनसांवगी तालुक्यातील राहेरा येथील वंदना सुरेश राजगुरू आणि अंबड येथील आरती मिरकर हे तिघे जण गाडी क्रमांक एम एच 21 एक्स 0 889 या वाहनाने घनसावंगी कडे जात होते .घनसांवगी जवळ गेल्यानंतर देशमुख पेट्रोल पंपासमोर गाडीचा चालक योगेश धोंडीराम याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही चार चाकी विजेच्या खांबाला जाऊन धडकली , त्यानंतर उलटी होऊन रस्त्याच्या खाली पडली. यामध्ये चालक वगळता वरील तिघेही ठार झाले आहेत आणि चालकावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Related Articles