Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

मदतीसाठी स्वतः संधी शोधून ती इतरांनाही द्या- संतोषी सिंह

जालना- एखाद्याला मदत करण्यासाठी आपण संधी शोधली पाहिजे आणि मदत करण्याची संधी दुसऱ्यालाही दिली पाहिजे असे मत इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोषी सिंह यांनी व्यक्त केले.
जालना जिल्ह्यात असलेल्या इनरव्हील क्लबच्या कामाचा आढावा घेण्यासाठी त्या आज जालन्यात आल्या होत्या. त्यांच्या स्वागता निमित्य हॉटेल सॅफ्रॉन पासून कार्यक्रम ठिकाण मधुर हॉल पर्यंत कार रॅली काढण्यात आली होती.


या आढावा बैठकीला इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट सविता लोया, सचिव छाया हंसोरा , सुवर्ण करवा, स्मिता चेचानी, शितल मंत्री, काजल पटेल, प्रीती मलावत, यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना संतोष सिंह म्हणाल्या की, हिंमत दाखवली तर खूप लोक आपल्या सोबत येऊ शकतात फक्त त्यांना मदतीसाठी आवाज देण्याची गरज आहे. त्याच सोबत कोरोना च्या काळामध्ये आपण अनेक आप्तस्वकीयांना मुकलो आहोत त्यांची उणीव भरून काढू शकत नाहीत, आणि त्यांना विसरू शकत नाहीत, मात्र त्यांना विचारल्याशिवाय पुढेही जाता येत नाही हे ही तेवढेच खरे आहे.तसेच मनाला ताजेतवाने आणि हसतमुख ठेवण्यासाठी हृदयामध्ये असलेले बालक कायमस्वरूपी जागे ठेवा त्यामुळे आनंदामध्ये भरच पडेल असेही संतोषी सिंह म्हणाल्या.


*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button