आमचं ठरलं! स्वबळावर निवडणुका- काँग्रेसचे प्रभारी ओझा
जालना – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी जाहीर केला आहे, त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत ,नगरपालिका या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत, आणि काँग्रेस साठीच मत मागणार असल्याचे स्पष्ट मत काँग्रेसचे प्रभारि रामकिसन ओझा यांनी व्यक्त केले .
केंद्राच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी आज जालन्यात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख ,शहराध्यक्ष शेख महमूद ,प्रभाकर मामा पवार ,आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री. ओझा म्हणाले की केंद्र सरकार महाराष्ट्रातील आघाडी सरकारला कसल्याही प्रकारची मदत करत नाही, जीएसटी चे पैसे देत नाही कोरोना काळात जाहीर केलेला मदत निधी मिळाला नाही ,आणि पेट्रोल डिझेलवरील कर कमी करत नाही त्यामुळे महागाईचा भडका वाढला आहे. या सर्व गोष्टीची जनजागृती करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने गावागावात जाऊन मोहीम राबविली जाणार आहे. दरम्यान होऊ घातलेल्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असून त्या जिंकून दाखवू असा विश्वासही ही त्यांनी व्यक्त केला.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app