Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

चोरीच्या मोटार सायकल आणि सुटे भाग विकणाऱ्या दोघांना अटक

जालना – आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या संस्थेच्या ओढून आणलेल्या मोटरसायकल आहेत, असे सांगून स्वस्तामध्ये चोरीच्या मोटरसायकल विकणारा एक मोटर सायकल चोरिचा आरोपी आणि अशा मोटर सायकल चे सुटे भाग करून मित्राच्या च्या  माध्यमातून इतरांना विकणाऱ्या अन्य एकाला चा  स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे .


भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे या गावचे हे दोघे आहेत. यापूर्वी देखील मोटार सायकल चोरी चे कनेक्शन याच गावात जोडले गेल्याचे निष्पन्न झाले होते.आता पुन्हा संतोष भास्करराव जाधव याने अनेक ठिकाणाहून मोटरसायकल चोरून आणल्या आणि परिसरातील लोकांना या मोटरसायकल च्या नावावर आर्थिक बोजा आहे. त्यामुळे त्या ओढून आणल्या आहेत, आणि स्वस्तात तुम्हाला देतो असे सांगून त्या विकल्या. काही मोटरसायकलचे टायर, इंजिन, आणि अन्य सुटे भाग संतोष भास्कर जाधव याने   त्याचा मित्र संतोष राजू पिंगळे याच्या मदतीने विकले ,तर वेगवेगळे सुटे भाग एकत्र करून काही मोटरसायकल देखील त्यांनी विकल्या चा आरोप आहे.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस कार्यरत होते. जालना शहरातील कदीम जालना पोलिस ठाण्यात देखील या विषयी तक्रारी दाखल होत्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस तपास करत असताना संतोष भास्कर जाधव हा गेल्या अनेक दिवसांपासून जालना शहरातील नूतन वसाहत भागांमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने त्याच्यावर पाळत ठेवली आणि काल शनिवार दिनांक 27 रोजी त्याला उड्डाणपुलाजवळ एका मोटारसायकल सह अडवून विचारपूस केली.त्या वेळी त्याला  समाधानकारक उत्तर देता आले नाही. अधिक चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरीच्या सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे येथे जाऊन संतोष राजू पिंगळे याच्या कडून काही साहित्य जप्त हि केले, जप्त केलेल्या साहित्यामध्ये दोन मोटार सायकल, एक इंजिन, चोरी केलेल्या काही साहित्याचा समावेश आहे.  सुमारे एक लाख 90 हजारांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे .


*पोलिसांचे आवाहन* बाजारामध्ये स्वस्तात सामान मिळत असेल तर वाहनचालकांनी ते घेऊ नये, घेताना त्याची रीतसर पावती घ्यावी, अधिकृत दुकानांमधूनच ते खरेदी करावे आणि जर रस्त्यामध्ये किंवा असे सुटे भाग स्वस्तात विकत असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी .असे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या  पथकातील पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, सचिन चौधरी, सॅम्युअल कांबळे ,कृष्णा तगे यांनी हा तपास केला.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button