ई- श्रम कार्डची मोफत नोंदणी आणि वाटप

जालना-सामाजिक कार्यकर्ते शेख इब्राहिम यांनी ई-श्रम कार्डची स्वखर्चाने केलेली नोंदणी ही श्रमिकांना दिवाळीची भेट आहे.हा उपक्रम निश्चित कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केले. मंमादेवी नगर येथे 1200 ई-श्रम कार्ड निशुल्क वाटप व दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
त्याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात ई-श्रम कार्डचे वितरण करण्यात आले. ह्या वेळी मंचावर आ. कैलास गोरंट्याल, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमुद, प्रभाग २७ चे नगरसेवक अरूण मगरे,विष्णू वाघमारे, अरविंद देशमुख,शेख इब्राहीम आदींची उपस्थिती होती.
परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी स्वराज मित्र मंडळ, मंमादेवी मित्र मंडळ, राहूल नगर मित्र मंडळ, करम-ऐ- सैलानी मित्रमंडळ ह्यांच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app