राज्य

आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यातच फुटला आरोग्य भरती चा पेपर; एक जण ताब्यात

जालना-राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या “ड” गटाच्या पद भरतीसाठी च्या पेपर फुटी प्रकरणी पुणे येथील सायबर सेलच्या पथकाने जालना जिल्हातील एका तरुणाला अटक केली आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान हॉलतिकीट आणि पेपर फुटीचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणानंतर मोठा गदारोळ माजला होता. ३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची ड गटाची  परीक्षा सुरू होण्याआधीच फुटला होता. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीसांकडून मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानुसार काल एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.


 मुराडे वय २९ असं पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचं नाव असून तो जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील नांदी येथील रहिवासी आहे. पेपर फुटी प्रकरणी आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता पाटील यांनी तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अटक केलेल्या तरुणाला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे सायबर सेल या प्रकरणी अधिक तपास करत आहे.दरम्यान, या पेपरफुटी प्रकरणानंतर राज्यभरातून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली जात होती. तसंच, राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही विरोधकांनी केली होती. अखेर या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२

मुख पृष्ठ


डाउनलोड edtvjalna app

 

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button