मराठवाडा

चार चाकी वर दरोडा ;सहा लाख रुपये पळविले

जालना
सेलू कडून परतुर कडे येणाऱ्या चार चाकी वाहनावर पाच इसमांनी दरोडा टाकून सहा लाख रुपये चोरून नेल्याची घटना आज दिनांक 14 रोजी घडली.
जालन्यातील आनंद नगर भागात कपिल ईश्वरलाल जयस्वाल हे व्यक्ती राहतात, आणि ते वर्धमान ट्रेडर्स येथे मुनीम म्हणून कार्यरत आहेत .आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जयस्वाल आणि त्यांचे काही सहकारी सेलू कडून परतुर कडे विस्टा कार क्रमांक एम एच 21 बीएफ 30 45 या वाहनाने येत होते. याच वेळी परतुर पासुन जवळच असलेल्या दुधना धरणाच्या पुलाजवळ पाच अज्ञात चोरट्यांनी ही कार थांबविली आणि त्यांच्याजवळ असलेल्या लोखंडी रॉडने गाडीच्या काचा फोडल्या ,तसेच चालकाच्या डोळ्यात तिखट टाकले आणि गाडीत असलेली सहा लाख रुपयांची रोकड लांबविली. दरम्यान जयस्वाल यांनी परतूर पोलीस ठाण्यात सहा लाख रुपयांची रोकड पळविल्या याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे .पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेत आहे

Related Articles