Advertisment
Jalna District

भोकरदन तालुक्यातून 40 लाखांचा दोन क्विंटल गांजा जप्त

 जालना- भोकरदन तालुक्यातील नळवाडी शिवारात असलेल्या तीन शेतकऱ्यांच्या शेतातून सुमारे दोन क्विंटल गांजा भोकरदन पोलिसांनी जप्त केला आहे. अजूनही ही कारवाई सुरूच आहे. भोकरदन चे उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये नळणीवाडी शिवारात शेजारी- शेजारी असलेल्या तीन शेतकऱ्यांच्या शेतातून ओला आणि वाळलेला गांजा जप्त केला आहे.

कापसाच्या पिकामध्ये गांजा उत्पादन घेतले जात होते. सुमारे दोन ते अडीच क्विंटल हा गांजा आहे आणि याची बाजारामध्ये किंमत 40 ते 45 लाख असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस कारवाई चालू होती.  कारवाई करण्यासाठी भोकरदन चे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप जोगदंड, हसनाबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष घोडके, मंजुषा सानप आदींनी ही कारवाई केली. दरम्यान अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.

*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button