Advertisment
Jalna District

तूर्तास कोणतेही निर्बंध नाहीत :सर्व शाळा सुरू कराव्यात- आरोग्य मंत्री टोपे

जालना- सध्या लग्न समारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रम वाढले आहेत. त्या अनुषंगाने लसीकरण सक्तीचे करता येत नाही, मात्र नागरिकांना त्याविषयी महत्त्व पटवून देऊन आरोग्य विभाग लसीकरणाचे काम करीत आहे.  वाढणाऱ्या गर्दीमुळे तूर्तास कोणतेही निर्बंध लावणे हे नागरिकांवर जाचक आणि कठीण होईल त्यामुळे केंद्र, राज्य आणि टास्क फोर्स यांचे मार्गदर्शन घेऊनच निर्बंध लावले जातील अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोस संदर्भात टास्क फोर्स सरकारकडे मागणी करत आहे, आणि राज्य सरकार या मागणीसाठी केंद्राकडे आग्रह धरणार आहे, त्यामुळे केंद्राने परवानगी दिल्यानंतर पुढील उपाय योजना केली जाईल अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदाल हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.  जनतेने या नवीन आजाराचा बाऊ करू नये आणि अफवांवर वर विश्वास ठेवू नये असे आवाहनही ना.टोपे  त्यांनी केले.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button