राज्य

बिबट्याच्या कातडीची तस्करी; बारा जणांची टोळी गजाआड

 गोंदिया-  वनसंपदेने नटलेला जिल्हा. जिल्हात मोठ्या प्रमाणात वन्यजीव यांच्या वावर असतो. जिल्हात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राणी ची हत्या झाल्याचे समोर आले. अशातच गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे वन्यजीव बिबट्याची कातडी आणि अवयव यांची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली.

या माहितीच्या आधारे वनविभागीय वन अधिकारी ( दक्षता ) नागपूर आणि गोंदिया वन विभाग द्वारा सालेकसा तहसील कार्यालय च्या पटांगणाजवळ सापळा रचून वन्यजीव बिबट्याच्या अवयवाची विक्री करण्याऱ्या 12 आरोपींना अटक करून त्यांच्या कळून बिबट कातडी 1 नग, बिबट पंजे नख सहित 4 नग, बिबट सुळे दात तुटलेले 2 नग व इतर 13 नग, बिबट मिश्या 10 नग , आणि 3 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी सुनावणी आहे.

*edtv news gondiya*

Related Articles