हिमायतनगरच्या जंगलात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले; अठरा वर्षीय मुलगाही बेपत्ता…!
नांदेड: आईसह एका १७ वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या केली तर पित्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत, एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह टाकराळा ता. हिमायतनगर जंगलात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याच कुटूंबातील अन्य एक १८ वर्षीय मुलगा बेपत्ता असल्याची माहितीही पुढे आली. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता अधिक वाढला आहे . सदर घटना सोमवारी उघडकीस आली असली तरी ती मागील आठ दिवसापूर्वी घडलेली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेहाची दुर्गंधी सुटली असल्याने घटनास्थळीच शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल…!
शांतामन सोमाजी कावळे ( ४५ ) यांचा मृतदेह गळफास लागलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर तीनही मृतदेह टाकराळा शिवारातील जंगलात आजू बाजूला काही अंतरावर आढळून आले. दरम्यान जंगलात मृतदेह पडलेले असल्याची खबर पोहचल्यानंतर प्रथम हिमायतनगर पोलिस तेथे पोहचले. परंतु घटनास्थळ हे तामसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तामसा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. भोकर विभागाचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक विजय कबाडे , उपविभागीय पोलिस अधिकारी राजणगावकर , एपीआय अशोक उजगीरे , तामस्याचे सपोनि किरवले यांना घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते . मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले.
१८ वर्षीय मुलगा बेपत्ता…!
दरम्यान याच कुटुंबातील एक १८ वर्षीय मुलगा अभिजित शांतामन कावळे हा अद्याप बेपत्ता असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
*edtv news, nanded*