खा. राजीव सातव यांच्या पार्थिवावर जालन्यात पुष्पवृष्टी
जालना
काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे आज पहाटे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. सातव हे गेल्या २३ एप्रिलपासून कोरोनाने संक्रमित होते. काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले आहे.
स्व.सातव त्यांचे पार्थिव जालना शहरातून आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हिंगोली कडे रवाना झाले .यावेळी जालन्याचे चे आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस पक्षातर्फे तर शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी शिवसेनेतर्फे दिवंगत खासदार सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली . सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते अंबड चौफुली येथे जमा झाले होते मात्र, पार्थिव घेऊन जाणारी रुग्णवाहिका इथे न थांबल्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेवरच पुष्पवृष्टी अर्पण करून आपली श्रद्धांजली वाहिली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महमूद कार्याध्यक्ष राजेंद्र राख, आदी पदाधिकार्यांची उपस्थिती होती.