राज्य

पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

पुणे -शहरातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत भर दिवसा काँग्रेस कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेनंतर पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. समीर हुसेन मनूर (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर हा चहा पिण्यासाठी एका हॉटेल समोर थांबला होता. यावेळी आलेल्या तीन जणांनी त्याच्यावर सहा गोळ्या झाडल्या. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने समीरचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरचे दोन तरूण सोबत आर्थिक व्यवहार होते. त्यातून त्यांच्यात अनेकदा वादही झाले आहेत. आरोपी आज सकाळपासूनच त्याच्या मागावर होते. घरापासून पाठलाग करत ते त्याच्या जवळ आले. चहा पिण्यासाठी त्याने नेहमीच्या हॉटेल बाहेर गाडी लावली आणि तो गाडीवरच बसला होता. इतक्यात हल्लेखोर त्याच्याजवळ आले आणि अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झाल्याने यामध्ये समीरचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. आणि सर्व शक्यता गृहीत धरून तपासाला सुरुवात केली. या प्रकरणातील एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

*edtv news pune*

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button