Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

तीन मजली घरात दोन तासात चोरी आणि दहा लाखांचा ऐवज लंपास

जालना शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या बडी सडक वरील माजी नगराध्यक्ष सौ. कल्पना लाहोटी आणि केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या सुनील लाहोटी यांच्या घरी रात्री बारा ते दोन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आणि सुमारे दहा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.

भर वस्तीत हे घर असताना अवघ्या दोन तासांमध्ये झालेला या घरफोडी मुळे परिसरातील उच्चभ्रू लोकांचे धाबे दणाणले आहे. सुनील लाहोटी आणि त्यांच्या पत्नी लग्नानिमित्त काल औरंगाबादला गेले होते. त्यांचे चिरंजीव शिवम सुनिल लाहोटी हे देखील लग्नानिमित्त काल जालना शहरातच एका मंगलकार्यालयात होते. दरम्यान खाली त्यांच्या केटरिंगचा व्यवसाय आणि वरच्या दोन मजल्यांवर घर अशा पद्धतीने या घराची रचना आहे .केटरिंगच्या दुकानातील कामगाराने दुकान बंद करून नेहमीप्रमाणे कुलपाच्या किल्ल्या त्यांच्या पायर्‍यावर फेकल्या होत्या .संध्याकाळी शिवम लाहोटी यांनीदेखील घरी येऊन पाहणी केली, आणि साडेआठ वाजता पुन्हा ते लग्नाच्या ठिकाणी गेले त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी 11 वाजता येऊन घर व्यवस्थित असल्याची खात्री करून गेले. त्यावेळी देखील घर व्यवस्थित होते मात्र पहाटे अडीचच्या सुमारास ज्यावेळी ते मंगल कार्यालयातून घरी आले त्यावेळेस त्यांना घर उघडे दिसले. हळूहळू त्यांनी इतर खोल्यांमध्ये पाहिले असता कुलूप तुटलेले  दिसले आणि घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याचे लक्षात आले. त्यावेळी  चोरी झाल्याचीत्यांची खात्री पटली,  त्यांनी सुनील लाहोटी यांना फोन लावून ही माहिती दिली. दरम्यान वीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम रकमेसह चार लाखांच्या सोन्याच्या पाटल्या, एक लाख 92 हजार रुपयांच्या सोन्याच्या 6 अंगठ्या आणि सोन्याची इतर दागिने असा सुमारे दहा लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला आहे. रात्री बारा ते दोन वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. अवघ्या दोन तासांमध्ये झालेल्या या घटनेने या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button