Advertisment
राज्य

औरंगाबाद हैदराबाद रेल्वे दोन दिवस उशिरा सुटणार

जालना- औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस दिनांक ८ आणि ११ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथून उशिरा सुटणारआहे.

चीखलठाणा-करमाड दरम्यान रेल्वे फाटक क्र. ५८ येथे आर.एच. गर्डर आणि आर.यु.बी. बॉक्सेस बसविण्या करिता दिनांक ०८ डिसेंबर आणि ११ डिसेंबर, २०२१ रोजी ३ तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे पुढील दोन गाड्यांवर या दोन दिवशी परिणाम झाला आहे तो पुढील प्रमाणे .

1. दिनांक ८ डिसेंबर आणि ११ डिसेंबर रोजी गाडी संख्या १७६६१ काचीगुडा ते रोटेगाव विशेष गाडी जालना-करमाड दरम्यान ४० मिनिटे उशिरा धावेल.

2. दिनांक ८ डिसेंबर आणि ११ डिसेंबर रोजी गाडी संख्या १७६५० औरंगाबाद-हैदराबाद विशेष गाडी औरंगाबाद येथून १२५ मिनिटे उशिरा म्हणजेच तिची नियमित वेळ दुपारी १६.१५ वाजता ऐवजी सायंकाळी १८.२० वाजता सुटेल.

*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button