राज्य

सचिन कुलकर्णी “वेदमूर्ती” पुरस्काराने सन्मानित

जालना- परतूर तालुक्यातील सावरगाव येथे असलेल्या श्री चतुर्वेदेश्वर धाम येथील विद्यार्थी वेदमूर्ती “अथर्ववेदि” सचिन रमेशराव कुलकर्णी यांना वेदमूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

वेदमूर्ती सचिन कुलकर्णी यांनी चतुर्वेदेश्वर धाम येथे अथर्व वेदामध्ये यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांच्या हयातीमध्ये आणि त्यांच्या सानिध्यात आपले अध्ययन पूर्ण केले आहे .त्यांच्या या अध्यायाना बद्दल इंदोर येथील वेदमूर्ती नरहरगुरु वैदिक आश्रम या संस्थेच्या  वतीने वेदांमध्ये अध्ययन केल्याबद्दल दरवर्षी पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार हा महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांचे शिष्य सचिन रमेशराव कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. इंदोर येथे मंगळवार दिनांक 7 रोजी प.पू युवराजस्वामी श्री माधव प्रसन्नाचार्य अवंतिका पीठाधीश्वर रामानुज कोट, उज्जैन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button