ऑक्सीजन सिलिंडरचा अवैध साठा ;परवाना रद्द करून कारवाई करण्याचे आदेश
जालना
तहसीलदार श्रीकांत भुजबळ आणि अन्य व औषधी प्रशासनाच्या सह आयुक्त अंजली मिटकरी यांनी दिनांक 9 मे रोजी गरीबशहा बाजार येथील एका गोदामावर छापा मारून ऑक्सीजन सह अन्य काही वायूचे सिलेंडर जप्त केले होते.
दरम्यान गेल्या चार-पाच दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू होती परवानाधारकाने परवाणा एके ठिकाणी आणि साठा दुसऱ्या ठिकाणी केल्यामुळे हा अवैध साठा समजून ऑक्सिजन वायू चे अठ्ठावीस मोठे आणि आठ लहान असे एकूण 36 सिलेंडर जप्त करण्याचे आदेश तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी अन्न व औषधी प्रशासनाला दिले आहेत.
9मे च्या मध्यरात्री गरीबशहा बाजारात ही कारवाई करण्यात आली होती. कारवाईनंतर हे गोदाम सतीश सुभाषचंद् जैन यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले .दरम्यान आपल्याकडे राज इंटरप्राईजेस या नावाने ऑक्सीजन सिलेंडर साठवणुकीचा परवाना असल्याचे सतीश जैन यांनी सांगितले. त्यानंतर महसूल आणि अन्न औषधी प्रशासनाने संयुक्त चौकशी केली असता हा परवाना ,गोल्डन जुबली शाळेच्या बाजूला असलेल्या शंकर नगर येथील आहे. मात्र साठवणूक गरीब शहा बाजारात होत आहे, त्यामुळे या गोदामात केलेला साठा हा अवैध साठा आहे असा निष्कर्ष काढून मे .राज इंटरप्राईजेस चा परवाना रद्द करावा असे आदेश तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी आज दिले. जप्त केलेल्या 36 सिलेंडरचा वापर हा सामान्य रुग्णालयात असलेल्या कोविड सेंटरमध्ये करावा आणि उर्वरित सिलेंडर सतीश जैन यांना परत करावेत असेही नमूद केले आहे.
* ग्राहकांवर होणार नाही परिणाम *
दरम्यान राज एंटरप्राइजेस चा परवाना रद्द केला तरी ग्राहकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही, कारण राज एंटरप्राइजेस हे उत्पादक नसून ट्रेडिंग करणारे होते, त्यामुळे त्यांचा आणि उत्पादनाचा काहीच संबंध नसल्याने ग्राहकांवर याचा परिणाम होणार नसल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली.