राज्य

कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांच्या नातेवाईकांना मिळणार50 हजार रुपये, इथे करा अर्ज

जालना- covid-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह सहाय्य म्हणून शासनातर्फे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये प्रदान करण्यास मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने ज्या नागरिकांचे नातेवाईक covid-19 आजाराने मृत झाले आहेत अशा नातेवाईकांनी शासनाकडे अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी केले आहे. जालना जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 1198 एवढ्या नागरिकांचा covid-19 त्यामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 718 ग्रामीण तर 469 शहरी भागातील नागरिकांचा समावेश आहे. आणि त्यामध्ये ही 763 स्त्री तर 436 पुरुषांचा समावेश आहे. मृतांच्या काही नातेवाईकांनी अर्जही केले आहेत मात्र ही संख्या जास्त असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे , संबंधित व्यक्तीचा मृत्यू covid-19 आजाराने झाले असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाइन लिंक वर किंवा शासनाच्या वेबपोर्टलवर सादर करावे, तसेच सेतू सुविधा केंद्र व ग्रामपंचायत कार्यालयात  सुद्धा अर्ज करता येऊ शकतो. जर एखादे प्रकरण नामंजूर झाले तर जिल्हा स्तरावर यासंदर्भात समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडे देखील दाद मागता येते. सदरील अर्ज मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे आहेत .अर्ज करताना अर्जदाराने स्वतःची माहिती आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, त्याच्या अन्य नातेवाईकांचे ना हरकत प्रमाणपत्र ,आणि स्वयंघोषणापत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे शासनाच्या mahacovid19relief.in या पोर्टल वर किंवाhttp://epassmsdma.mahait.org/log.in या लिंकवर भरावीत असेही आवाहन करण्यात आले आहे.

*मृताचा नातेवाईक कुठूनही भरू शकतो अर्ज*उदा- बुलढाणा जिल्ह्यातील एखाद्या नागरिकाचा मृत्यू जालना जिल्हातील रूग्णालयात झाला असेल तर या रुग्णालयाचे प्रमाणपत्र घेऊन सदरील मृताचे नातेवाईक त्या  जिल्ह्यात अशा प्रकारचा अर्ज करू शकतात. रुग्णाचा मृत्यू कुठे झाला हे महत्त्वाचे नसून मृत व्यक्ती कोणत्या जिल्ह्यातला आहे त्या जिल्ह्याशी त्याचा संबंध येणार आहे. आम्ही अर्ज भरताना आधार क्रमांकानुसार किंवा अन्य माहितीनुसार तो अर्ज संबंधित जिल्ह्या मध्येच जाणार आहे.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Related Articles