राज्य

12 ते 17 डिसेंबर दरम्यान नोकरी मिळविण्याची संधी

अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मंत्री यांच्या निर्देशांनुसार राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रत नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने, दि.12 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत भव्य“राज्यस्तरीय महारोजगार”आयोजन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

त्याअनुषंगानेwww.rojgar.mahaswayam.gov.inवेबपोर्टलवर “STATE LEVEL MEGA JOB FAIR2021”  रोजगार मेळावा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

           नोकरी हवी असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध नामांकित उद्योग, व्यवसाय या मेळाव्यामधे सहभागी होणार असुन  नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जालना,  एस. बी. आय. इन्सुरंन्स प्रा.लि.जालना, विक्रम टि प्रोसेसर प्रा.लि. जालना, ॲप्रोक्राप इंजिनिअरिंग प्रा.लि. जालना, आई मल्टीस्पेशिलीटी हॉस्पीटल ॲन्ड नर्सिंग होम जालना, इ. सारख्या नामांकित आस्थापन, कंपन्यांसह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्या मधील कंपन्या या मेळाव्यात वेगवेगळ्या प्रकारची रिक्तपदे नोंदवत आहेत व अजूनही काही चांगल्या आस्थापना यामध्ये सहभाग नोंदविणार आहेत.

सर्वसाधारणपणे 9 वी  पास  पासून पुढे किंवा 10 व 12 वी,आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी.ई. व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदांसह सहभागी होण्यासाठी या आयुक्तालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले असून, विविध क्षेत्रातील साधारणत: किमान 25 हजार रिक्तपदे उमेदवारांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

            हा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आवाहन करण्यात येते की,या संधीचा लाभ घेण्यासाठी नोकरी इच्छुकयुवक-युवतींनी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.inया वेबसाईटला भेट द्यावी. होमपेजवरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉबफेअर या बटनावर क्लिक करुन त्यातील “STATE LEVEL MEGA JOB FAIR2021” या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रताधारण करीत असल्याची खात्रीकरुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन, उपलब्ध असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.

 इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल. काही अडचन  आल्यास जिल्हा कौशल्य विकास, व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना  02482-299033 या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांकावर सकाळी 10.00 ते सायंकाळी  6.00 वाजेपर्यंत संपर्क साधवा. इच्छुक युवक युवतीपर्यंत आपला पसंतीक्रम नोंदवून रोजगाराच्या या सुवर्ण संधीचा निश्चित लाभ घेण्याचे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना संपत चाटे यांनी केले आहे. 

*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

 

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button