जालन्यात घुमला आंतरराष्ट्रीय बँडचा आवाज
जालना- मराठी मध्ये एक म्हण आहे” हौसेला मोल नाही” त्यानुसार अनेक वेळा पैसा असूनही हौस करणे अनेकजण टाळतात त्याची कारणेही वेगवेगळी असतात, मात्र आज दिनांक 13 रोजी जालन्यात एका शुभविवाह निमित्त मध्य प्रदेशमधील जबलपूर येथून एका आंतरराष्ट्रीय बँड पथकाला बोलावण्यात आले आहे. या बँडचा आवाज सहा वाजल्यापासून जालना शहरात घुमत आहे.
निमित्त आहे जालना पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष दीपक भुरेवाल यांच्या चिरंजीवांच्या शुभविवाहा चे. या विवाहाचं आणखी एक वैशिष्ट म्हटले तर अर्ध शतकापेक्षा जास्त रुपये खर्च करून मान्यवर व्यक्तींसाठी तयार केलेल्या चांदीच्या पत्रिका. फक्त त्या किती केल्या आणि किती मान्यवरांना वाटल्या हे मात्र विचारू नका! त्यानंतर लाखो रुपये खर्च करून जबलपूर येथून आमंत्रित केलेला आहे. श्याम ब्रास बँड या नावाने चौथी पिढी कार्यरत असलेल्या मध्य प्रदेश मधील जबलपूर येथील हा बँड आहे. मनोज ईश्वरी प्रसाद बैन, ही तिसरी पिढी आज जालन्यात आली आहे. या बँड च्या नावापेक्षा मनोज सेंसोफोन या नावानेच या बँडची ओळख आहे आज फक्त बँडच नव्हे तर त्यांच्या सोबत आंतरराष्ट्रीय महिला कलाकार देखील आलेल्या आहेत. 40 लोकांचे हे बँड पथक जालनेकरांसाठी एक कुतूहलाचा विषय ठरला आहे. देशाच्या विविध काण्या कोपऱ्यामध्ये फिरत असताना सुमारे पंधरा वर्षांपूर्वी दूरदर्शन वर सर्व भाषेतील गाजलेलं” मिले सुर मेरा तुम्हारा” या गाण्यापासून प्रेरणा मिळाली असल्याची माहिती या बँड पथकाचे प्रमुख मनोज बैन यांनी दिली.
दरम्यान जालनेकरांना शुभविवाह च्या निमित्ताने काहीतरी वेगळी पर्वणी मिळावी या हेतूने हा आंतरराष्ट्रीय बँड आपण जालन्यात बोलावला असल्याची माहिती वरपिता दीपक भुरेवाल यांनी दिली.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app