Jalna Districtजालना जिल्हा

सकारात्मकतेकडे जाण्यासाठी वेळ लागेल- के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना

जालना- अनेक वर्षांपासून पोलीस प्रशासनात नकारात्मकता भरलेली होती, आणि ती एवढ्या लवकर बाहेर निघणे सोपे नाही. मात्र गेल्या वर्षभरापासून आम्ही याच्या वर काम करत आहोत यश-अपयश या विषयी आम्ही बोलणार नाहीत हे सामान्य माणसांनी ठरवायचा आहे परंतु आम्ही केलेल्या कामाचा परिणाम म्हणून फक्त 15 गुन्ह्यांचा तपास बाकी आहे. त्यामुळे आम्ही काय करत आहोत हे सांगण्यापेक्षा ते करत राहण्यावर आमचा भर आहे. अशी माहिती औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम .मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी आज दिली.

गेल्या पाच दिवसांपासून जालना पोलीस दलाची तपासणी त्यांनी केली. आज शेवटच्या दिवशी प्रसिद्धिमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांची उपस्थिती होती.दरम्यान जालना जिल्ह्यात 7 नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. ज्या वेळेस ही मंजुरी मिळेल त्या वेळेस या सर्व पोलीस ठाण्यांचा कर्मचारी वर्ग देखील नवीन भरती करण्यासाठी आपण मागणी केली असल्याचेही प्रसन्ना म्हणाले.

* ही आहेत नवीन प्रस्तावित सात पोलीस ठाणे*

तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, कादराबाद, राजुर, वाटूर, आणि जामखेड.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Related Articles