पाण्यात ट्रॅक्टर बुडून तरुणाचा मृत्यू; एकजण बचावला
जालना- जालना औरंगाबाद महामार्गावर नागेवाडी शिवारात ड्रायपोर्ट चे काम चालू आहे. याच परिसरात एक मोठी खदान म्हणजेच तलावदेखील आहे .त्याच्या बाजूलाच जमिनीचे सपाटीकरण चालू आहे. या सपाटी करण्यासाठी औरंगाबाद तालुक्यातील लाड सांगवी येथील चाळगे नावाचा व्यक्ती ट्रॅक्टर चालवत होता.
दरम्यान हे ट्रॅक्टर आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तलावात बुडाले आणि यात ट्रॅक्टर वर असलेला अनिल राजेंद्र उबाळे या अठरा वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. ट्रॅक्टरचा चालक चाळगे हा बाहेर आला आहे.चाळगे याने आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास लाड सांगवी येथून अनिल राजेंद्र उबाळे या तरुणाला सोबत घेऊन नागेवाडी शिवारात आला, आणि जाताना एक जण ट्रॅक्टर आणि एक जण मोटरसायकल घेऊन परत जाऊ असे त्यांचे नियोजन ठरले होते. मात्र अकरा वाजेच्या सुमारास हे दोघे ट्रॅक्टर वर असताना जमीन सपाटीकरण करणारे हे ट्रॅक्टर तलावात गेले. अनिलला पोहता येत असताना देखील तो बाहेर का आला नाही? असा प्रश्न त्याच्या नातेवाईकांना पडला आहे. दरम्यान ट्रॅक्टर बुडाल्यानंतर देखील चाळगे याने ही बातमी कोणाला सांगितली नाही, मात्र परिसरात काम करत असलेल्या काही लोकांनी ही घटना पाहिली आणि लाड सांगवी तील काही लोकांना माहिती दिली. त्यानंतर या गावकऱ्यांनी चाळगे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ट्रॅक्टर बुडालेले असल्याचे त्यांनी सांगितले. गावकऱ्यांनी या तलावाकडे धाव घेतली दरम्यान जालन्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अनिल उबाळे याचा मृतदेह तलावातून बाहेर काढला आहे. अनिल उबाळे याचे लाड सांगवी येथे घर आहे. आई वडिलांचा पारंपारिक शेती हा व्यवसाय आहे. मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे तर घरी एक लहान बहीण देखील आहे. अनिल हा उबाळे यांचा एकुलता एक मुलगा होता .दरम्यान सायंकाळी अनिलच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. तर चंदंनजिरा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. *दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
डाउनलोड edtvjalna app