Jalna Districtजालना जिल्हा

जेईएस महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 जालना- जे.ई. एस महाविद्यालयात आज  मंगळवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव श्रीनिवास भक्कड यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात इयत्ता बारावी बोर्ड, एमएचटी, सीईटी, जेईई, परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच अकरावी बारावी मध्ये कला वाणिज्य शाखेत गुणानुक्रमे प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाला अन्य प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये संस्थेचे प्रशासकीय अधिकारीडॉ. जवाहर काबरा प्राचार्य डॉ. शिवनारायण बजाज, पर्यवेक्षक प्रवीण बाफना पर्यवेक्षक करूणा वासनिक, उपप्राचार्या श्रीमती रोटकर आदींची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात विशेष काम केलेल्या एस.एम. ताठे, आणि एम.जी. सोनी या शिक्षकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बाबासाहेब वाघ यांनी केले तर प्रा. गजानन बावस्कर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button