Jalna Districtजालना जिल्हाबाल विश्व

लक्ष प्राप्तीसाठी आणि गुणांच्या फायद्यासाठी धनुर्विद्या- प्रा.वर्मा

 जालना -लक्ष प्राप्ती करून 25 गुणांचा फायदा घेण्यासाठी धनुर्विद्या चे महत्त्व आहे. सामान्य जीवन जगत असताना सातत्य आणि ध्येय साधण्यासाठी याचा उपयोग होतो. असे मत जालना येथील जे.ई. एस. महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. हेमंत वर्मा यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत धनुर्विद्या निवड चाचणी स्पर्धा या केंद्रावर पार पडली. विद्यापीठांतर्गत 18 संघांनी आणि 70 खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभाग नोंदवला होता. तीन गटांमध्ये झालेल्या या निवड चाचणीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत खेळण्यासाठी पाठविले जाणार आहे.  शैक्षणिक स्तरावर तर या खेळाचा फायदा होतोच ,त्याच सोबत क्रीडा धोरणात आणि खेलो इंडिया मध्ये या खेळाचा समावेश असल्यामुळे विद्यार्थ्यांना पंचवीस गुणांचाही  फायदा होतो.  सोबतच अभ्यास करताना आणि प्रत्यक्षात जीवन जगताना ध्येयप्राप्तीसाठी सातत्य कसे टिकवायचे! आणि लक्ष प्राप्ती कसे करायचे याचे धडे देखील या खेळाच्या माध्यमातून मिळतात असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक प्रकाश दुसेजा यांचीही उपस्थिती होती.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Related Articles