Jalna Districtजालना जिल्हा

दंगा नियंत्रण दलाची आयजींनी केली पाहणी; पोलिसांचे ढिशुम- ढिशुम

जालना -बारा महिने निवांत दिसणाऱ्या पोलिसांना देखील वेगवेगळ्या पद्धतीचे सराव करावे लागत असतात आणि याची पाहणी देखील केले जाते. परंतु सामान्य माणसांना पोलिसांच्या या कसरतीची आणि त्यांच्या सरावाची फारशी माहिती मिळत नाही. पोलिसांचा मात्र हा सराव चालू असतो. औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी पाच दिवस जालना जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेची तपासणी केली.

त्याचाच एक भाग म्हणून एखाद्यावेळी दंगा सदृश्य परिस्थिती उद्भवली तर त्याला कसे तोंड द्यायचे याच्या सरावाची देखील त्यांनी पोलिस कवायत मैदानावर पाहणी केली. अर्थात हे सगळं डिशुम- डिशुम होतं .पोलिसांनीच पोलिसांसाठी करण्यात येणाऱ्या सरावाचं हे ढिशूम-ढिशूम! एखादा दंगा नियंत्रणात आणण्यासाठी कोणकोणते टप्पे वापरले जातात आणि ते कसे वापरायचे याविषयीचा हा सराव होता. एखाद्या जमावाला किंवा दंग्याला पांगविण्यासाठी किंवा त्यांना आटोक्यात आणण्यासाठी सुरुवातीला पाण्याचा मारा त्यानंतर लाठीचार्ज त्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या तरीदेखील जमाव काबु मध्ये घेत नसेल तर शेवटी गोळीबार अशा पद्धतीने जमावाला नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे टप्पे आखले जातात. याच दरम्यान पोलिसांचे काही कर्मचारी जखमी झाले तर त्यांना औषध उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिकेची देखील व्यवस्था केलेली असते. याचाही सराव येथे करण्यात आला. या सर्वाचा पोलिसांना वेगळाच आनंद मिळाला. अन्य वेळी दगडफेक करणाऱ्या जमावावर लाठीचार्ज करत असताना, आज खोटी- खोती का होईना पोलिसांनीच पोलिसांवर दगडफेक केली,आणि पोलिसांनीच पोलिसांवर लाठीचार्ज ही केला.
या आगळ्यावेगळ्या ढिशूम-ढिशूम चा पोलिसांनी मनसोक्त आनंद घेतला. श्री. प्रसन्ना यांच्यासोबत पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, गृह शाखेचे प्रभारी पोलिस उपाधीक्षक संजय व्यास, यांचीही यावेळी उपस्थिती होती.

*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button