राज्य

आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे -ना. अशोकराव चव्हाण

जालना -“आम्ही आहोत म्हणून आघाडीची सत्ता आहे” महाविकास आघाडी मध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राज्य स्थिर ठेवण्यात आमची महत्त्वाची भूमिका आहे. असे खडे बोल राज्याचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज आघाडी सरकारला सुनावले आहेत.  जालना जिल्ह्यात चार नगरपंचायत च्या निवडणुका होत आहेत तालुक्याचे ठिकाण असलेले मंठा या गावी देखील या निवडणुका होत आहेत.  या निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये आज गुरुवार दिनांक 16 रोजी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे प्रभारी रामकिसन ओझा, आ. राजेश राठोड, आ. कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आमदार सुरेश जेथलिया, अन्वर बापू देशमुख, काँग्रेसचे परतुर तालुका अध्यक्ष नीलकंठ वायाळ, परतूर चे तालुकाध्यक्ष बाबा गाडेकर, आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना ना. चव्हाण म्हणाले की आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा दुर्दैवी आहे, आणि त्यामुळे आघाडी सरकार प्रचंड नाराज आहे. खरं तर प्रत्यक्षात केंद्र सरकारलाच आरक्षण मिळू द्यायचे नाही. आरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या इम्पीरियल डेटा संदर्भात केंद्र सरकारने घुमजाव केले आहे . या डेटामध्ये त्रुटी असल्यामुळे तो ग्राह्य धरता येणार नाही असे सांगितले आहे. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस त्यांनी हा डेटा तयार केला त्याच वेळेस त्यांनी हा डेटा चुकीचा आहे असे म्हटले पाहिजे होते. त्यानुसार संसदेत जर केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली तर आरक्षण मिळू शकले असते. परंतु या सरकारला सर्वच समाजाचे आरक्षण संपवायचे आहे. त्यामध्ये मुस्लिम आरक्षण, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, यांचा समावेश आहे. असेही ते म्हणाले. दरम्यान आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे हा आघाडी सरकारला गर्भित इशारा देतानाच त्यांनी नगरपंचायत च्या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवर आहेत त्यामुळे प्रत्येक जण स्वतंत्रपणे लढत आहे मात्र राज्यस्तरावर सरकार स्थिर ठेवण्यासाठी आघाडी सरकारने जो निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने सरकार मजबूत राहिले पाहिजे आणि त्यासाठी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी काँग्रेसचे प्रभारी रामकिसन ओझा, आ. राजेश राठोड, आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख ,माजी आमदार सुरेश जेथलिया, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप देशमुख यांनी केले.

*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button