राज्य

Any Desk ने घातला साडेपाच लाखांना गंडा

जालना- बँकेची ऑनलाइन तक्रार करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला संबंधित एजन्सीकडून मोबाईलवर एनी डेस्क हे ॲप डाऊन करायला लावले, आणि त्याच्या खात्यावरून इतरांना साडेपाच लाख रुपये पाठवून रुपयांना गंडा घालण्यात आला. विशेष म्हणजे बँके कडूनच ही चौकशी करण्यात आली आहे असा भास ही निर्माण करण्यात आला होता.

याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. भारत संचार निगम लिमिटेड मध्ये काम करणाऱ्या गौतम रामराव वावळे 56 ,यांनी त्यांचे पैठण तालुक्यातील राजापूर येथील मित्र अनिल गांगुर्डे यांच्या पत्नीच्या नावाने दोन लाख रुपयांचा धनादेश दिला होता. त्या अनुषंगाने दिनांक 15 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनिल गांगुर्डे यांचा मित्र रमेश चव्हाण यांचा वावळे यांना फोन आला आणि वैशाली गांगुर्डे यांच्या नावाने असलेला चेक औरंगाबाद जिल्ह्यातील आडुळ शाखेत वटविण्यासाठी आला आहे. तो वटत नाही असे सांगितले. त्यासोबत या धनादेशावर असलेल्या सही मध्ये तफावत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळी वावळे यांनी रमेश चव्हाण यांच्या फोनवरच बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधून सदरील सही आपलीच आहेत आणि गेल्या तीस वर्षांपासून मी बँकेचा ग्राहक असल्यामुळे हा चेक पास करावा अशी विनंती केली. परंतु बँकेने ती विनंती मान्य केली नाही. त्यामुळे संबंधित व्यवस्थापकाची तक्रार करण्यासाठी वावळे यांनी गुगलवर एसबीआयच्या ऑनलाइन तक्रारीसंदर्भात शोध घेतला .त्यावेळी त्यांना 98 271 89 664 हा नंबर दिसला आणि त्या नंबर वर वावळे यांनी फोन केल्यानंतर बँकेचे कर्मचारी त्यांच्याशी संपर्क साधतील असा संदेश मिळाला. थोड्याच वेळात त्यांना
80 93 40 86 41 ,
79 69 10 89 02,
85 219 12 352 या नंबर वरून संपर्क केला गेला, आणि वावळे यांचा धनादेश पारित करण्यासाठी मोबाईलवर एनी डेस्क(Any Desk) हे ॲप डाऊन करायला सांगितले . ते झाल्यानंतर कस्टमर केअर च्या प्रतिनिधीने वावळे यांना विश्वासात घेऊन ॲप विषयीची सर्व माहिती घेतली. टप्प्याटप्प्याने पाच लाख 69 हजार 829 रूपये खात्यामधून काढून घेतले. त्यानंतर वाहुळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दरम्यान या ॲपच्या माध्यमातून हे पैसे दुसऱ्याच्या खात्यात वर्ग केले गेले आहेत. त्यामध्ये फ्लिपकार्ट, पासफार टेक्नॉलॉजी, ॲमेझॉन, Equitar, या नावाने हे सर्व व्यवहार केले गेले आहेत.एकूण अकरा व्यवहार केले गेले.

-दिलीप पोहनेरकर, 9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Related Articles